Advertisement

Responsive Advertisement

बैलांची शेतीची कामे संपल्याने बाजारात पशुधन विक्रीसाठी दाखल, भाव झाले कमी, बळीराजा आर्थिक अडचणीत

 शेतीची कामे आटपल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपले पशुधन बाजारात विक्रीसाठी मांडली आहे. त्यामुळे पशुधनाचे भाव कमी झाले आहे.

बैल बाजार 





बळीराजा आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपले पशुधन बाजारात विक्रीसाठी आणले.


न्यूजबदलताना महाराष्ट्र:-

मराठी महिन्यातील, आखाड संपून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. आणि या दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती खूप ढासळलेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पशुधन बाजारात विक्रीसाठी आणले आहे. आणि त्या पाठोपाठ आता शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात झाली आहे.

त्यामुळे अनेकांनी दोन बैल सांभाळण्यासाठी एक व्यक्तीला वेळ द्यावा लागतो. म्हणून आठवडी बाजारात जीवापाड जपलेली बैल जोडी विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्या पाठोपाठ शेतकरी जास्त आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे त्यांनी आपली बैलजोडी बाजारात विक्रीसाठी मांडलेली आहे.

परंतु सध्या जनावरांना भाव नसल्याने एक लाखांना घेतलेली बैल जोडी रविवारच्या आठवणी बाजारात व्यापारी 75 ते 80 हजारांना मागितल्याचे एक शेतकऱ्यांनी सांगितले.

यांदा सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध झाला आहे. परंतु शेतीची कामे अंतिम टप्प्यात आल्यामुळे अनेक शेतकरी आपली जनावर विक्री करीत आहे यात जास्त कारण म्हणजे शेतकरी आर्थिक गर्जंद असल्यामुळे त्यांनी आपली बैलजोडी विक्रीसाठी काढली आहे. यात एक महेश 75000, तर गाय तीस ते पस्तीस हजारांना व्यापारी मागत असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेला आहे.

मशागतीसाठी मी जून महिन्यात बैलजोडी खरेदी केली होती मात्र आता शेतीची कामे संपत आली आहे. पिके ही जोमात आहेत त्यामुळे घेतलेली जनावरे विक्री करून पुन्हा पुढील वर्षी घेऊ, अशी शेतकऱ्यांची म्हणणे आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जनावरे विक्री घेतली आहे, तर काहीजण ऊसतोड कामगार जेव्हा जातील, तेव्हा विक्री करत असल्याची व्यापाऱ्यांनी सांगितलेले आहे.

बाजारातील म्हशींचे भाव

म्हशीचे भाव 


75 हजार म्हशीचे भाव सध्या बाजारात चालू आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पशुधन असून, मोजक्या शेतकऱ्यांकडे आहे यात म्हशी पाळणाऱ्यांची प्रमाण खूप कमी आहे. आता प्रत्येक घरी दुधाचा वापर केला जातो एक महेश पंधरा ते पंचवीस लिटर दूध देते त्यामुळे चांगल्या जातीच्या एक म्हशीला बाजारात 75 हजारापेक्षा अधिक भाव मिळतो.


बाजारात सर्वाधिक विक्री विक्रेते शेतकरीच आहे, घेणारे फक्त व्यापारी आहे.

सध्या पेरणीची कामे संपली असून शेतकरीच जनावर विकत आहे त्यामुळे ही जनावर व्यापाऱ्या शिवाय दुसरे कोणीही घेत नसल्याने मागील त्या भावात शेतकऱ्यांना विकावी लागत आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे.

अनेक शेतकरी पोळ्याला बैल विकतात.

कारण अशी आहे की आता शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत तरी देखील अनेक शेतकरी आपल्या जवळ असलेली बैलजोडी विक्री करत नाहीअनेक शेतकरी पोळा सणापर्यंत कुटावर बैल ठेवतात त्यानंतर ऊसतोड कामगारांना बैलाची विक्री करतात आणि पुढील वर्षी पुन्हा मे व जून महिन्यात पुन्हा खरेदी करतात.

Post a Comment

0 Comments